नवापूर। वृक्ष हे मानवी जीवनासह पर्यावरणाचा समतोल राखत असल्याने वृक्ष लागवडीसह संगोपन करण्याच्या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा असे प्रतिपादन आ.सुरूपसिंग नाईक यांनी केले.डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगण्यात आ.सुरूपसिंग नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक,कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे, संचालक मंडळातील सदस्य, कार्यालय अधीक्षक दिलीप पवार सचिव भूपेंद्र वसावे, पी डी महाजन, अभियंता व्ही बी पाटील, शेतकी अधिकारी अनंतराव देसाई, अनिल भावसार,डॉ निलेश गांगुर्डे प्रकाश वळवी,डी टी पवार व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
प्रत्येक कर्मचार्याने एक वृक्ष लावून संगोपन करावे
पुढे आ.सुरूपसिंग नाईक म्हणाले की प्रत्येक कर्मचार्याने एक वृक्ष लावावे. अपत्याप्रमाणे त्याचे संगोपन केल्यास आगामी काळात सर्वत्र हिरवळ निर्माण होऊन त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.महिलांनीही वृक्षांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतल्यास खर्या अर्थाने वृक्षवाढ व त्याची जोपासना झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याच्या वसाहतीत चेअरमन शिरीष नाईक यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.