फैजपूर – रावेरचे आ हरिभाऊ जावळे यांची बदनामी व्हावी या उद्देशाने शहानिशा न करता वृत्त प्रकाशित करणार्या सोशल मिडियावरील एका ऑनलाइन वृत्त वाहिनीवर व वृत्तावर अश्लील भाषेत प्रतिक्रिया देणार्या दोघांविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत फैजपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप वसंतराव पाटील रा. भुसावळ यांना रेड जळगांव ऑनलाइन न्यूज पेपरच्या पेजवर साकळी येथे तब्बल सव्वा तीन कोटीचे बांधले स्वच्छता गृह या आशयाची बातमी वाचण्यात आली. सदर हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सी एस आर यांच्या फंडातून तीन कोटी 29 लाख रुपये मंजूर करून त्या रकमेतून यावल रावेर मतदार संघातील शाळांमध्ये 68 स्वच्छता गृह बांधण्यात आली आहे. जळगांव ऑनलाइन न्यूज पेपर यांनी बदनामीची काही एक शह निशा न करता वरील रकमेत साकळी ता यावल येथे फक्त एक स्वच्छता गृह बांधले आहे अशी खोटी बातमी प्रसिध्द केली. आ हरिभाऊ जावळे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने बातमी प्रसारित केली आहे तसेच वर नमूद बातमीत संजय महाजन भडगांव व वंदेमातरम या नावाने असलेल्या फेसबुकवर अश्लील भाषेत शिवीगाळ करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. व आ हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेस काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे. म्हणून रेड जळगांव ऑनलाइन न्यूजपेपर व संजय महाजन भडगांव आणि वंदेमातरम फेसबुक अकाऊंट यांच्या विरूद्ध संदीप वसंतराव पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व सहकारी करीत आहे.