इंग्लंडमधील अपयशाला कमी सराव कारणीभूत : धोनी

0

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिकेआधी केवळ एकच सराव सामना खेळला. तोही चार दिवसांऐवजी तीन दिवसांचा सामना खेळविण्यात आला होता. ही संख्या खूपच कमी होती. त्यामुळे भारतीय संघाच्या कसोटी मालिकेतील अपयशाला कमी झालेला सराव जबाबदार असल्याचे रोखठोक मत माजी कर्णधार धोनी  याने शनिवारी व्यक्त केले.

इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-४ अशा फरकाने गमावल्यानंतर क्रिकेट चाहते, देशातील माजी कर्णधार, माजी क्रिकेटपटू या सर्वांनी कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली. गेल्या १५ वर्षांत हा परदेशातील सर्वोत्तम कसोटी संघ आहे, असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले होते. त्यावर बरीच चर्चा सुरू आहे.