इंग्लंडला विजयासाठी 178 धावांची गरज

0

अ‍ॅडिलेड । दुसर्‍या कसोटीतील तिसर्‍या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 227 गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 138 धावात गुंडाळण्यात इंग्लंडला यश आले. दुसर्‍या डावातील या अल्प धावसंख्येनंतरही ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 6 विकेट्सची तर इंग्लंडला विजयासाठी 178 धावांची गरज आहे.

इंग्लंडच्या दुसर्‍या डावाची सुरुवातदेखील खराब झाली आहे. उपाहारापर्यंत त्यांचे 68 धावावर दोन गडी बाद झाले होते. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 178 धावांची गरज आहे. दुसर्‍या डावात नॅथन लायनने सलामीवीर कूकला अवघ्या 16 धावावर बाद केले. तर मिचेल स्टार्कने मार्क स्टोमॅनला तंबूचा रस्ता दाखवला. जेम्स विंच 15, तर डेव्हिड मलान 29 धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून ज्यो रूट 67 धावांवर खेळत असून त्याला बेन स्टोक्स 5 धावांवर साथ देत आहे. या दोघांवर इंग्लंडची मदार असून, शेवटच्या दिवशी हा सामना रंगतदार होणार आहे.