इंग्लंडला 282 चे आव्हान

0

लंडन । महिला वर्ल्ड कप आज पासून लंडन येथे सुरू झाला.या वर्ल्ड कपचा पहिला सामना यजमान इंग्लंड व भारत याच्यात होता. इंग्लंडने नाणेफेक जिकून प्रथम भारताला फलंदाजासाठी निमंत्रण दिले.फलंदाजीला आलेल्या भारताच्या मिताली ब्रिगेडच्या राऊत व मंधाना यांनी सुरवात केली. पहिल्या षटकापासून मंधाना आक्रमक खेळी करण्यास सुरवात केली होती. मंधाना एका बाजुने धुव्वाधार खेळी करित होती.तर दुसर्‍या बाजुला राऊत संयमाने खेळी करित होती. दोन्ही फलंदाजीचा फलंदाजी पाहता भारताचा महिला संघ मोठी धावसंख्या उभी करणार अशी चिन्हे दिसत होती.मात्र 26.5 चेडूला मंधाना 90 धावांवर बाद झाली. भारताचा पहिला फलंदाज 144 धावांवर बाद झाला.यानंतर आलेल्या कर्णधार हिने सुध्दा धुव्वाधार फलंदाजी करण्यास प्रारंभ करून इंग्लंडच्या गोलंदाजावर दबाव निर्माण केला.भारताने तीन फलंदाज घालवून 281 धावा 50 षटकात केल्या. यामध्ये राऊत 86, मंधाना 90, राज 71 तर कौर नाबाद 24 धावा केल्या.या 281 धावांमध्ये राऊत ,मंधाना, कर्णधार राज यांनी आपआपली अर्धशतके पुर्ण केली.

मितालीचे अर्ध शतक
42.3 चेडूला टोलविण्याच्या प्रयत्नात असतांना 86 धावांवर झेल बाद झाली.कर्णधार राज हिेला साथ देण्यासाठी आलेल्या हरमनप्रीत कौर सुध्दा जोरदार फलंदाजी सुरू ठेवली. मिताली राजचे शेवटच्या चेडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात 71 धावांवर झेंलबाद झाली.तर कौर ही 24 धावांवर नाबाद राहिली. भारताच्या महिला संघाने 50 षटकात 3 फलंदाज गमवून 281 धावां केल्या.

144 धावांची भागीदारी
इंग्लंडने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनया श्रुबसोल हिने गोलंदाजीला सुरवात केली.तिने 6 षटकात 37 धावा 6.17 रेनरेटने दिल्या.कॅथरिन ब्रंट हिने 7 षटकात 50 धावा दिल्या.त्यात 1 षटक विनाधावांचे टाकले.नताली शिवर 3 षटकात 18 धावा दिल्या. डॅनिले हॅझेल 10 षटकात 51 धावा देवून 1 गडीबाद केला.जेन्नी गन हिने 10 षटकात 46 धावा दिल्या. अ‍ॅलेक्स हार्टले हिने 7 षटकात 38 धावा दिल्या.कर्णधार हिदर नाइट गोलंदाजीची धुरा सांभाळली 7 षटकात 41 धावा देवून 2 फलंदाज बाद केले. इंग्लंडचा एकही गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करू शकला नाही. यांनतर पुनम राऊत व कर्णधार मिताली राज ह्यांनी जोरदार फलंदाजीला केली. राऊत खेळतांना दोन वेळा जिवनदान मिळाले.या मिळालेल्या जिवदानाचा पुरेपर फायदा राऊतने घेतला.

इंग्लंडची गोलंदाजी असफल
इंग्लंडच्या अनया श्रुबसोल 6 षटके कॅथरिन ब्रंट हिने 7 षटके नताली शिवर 3 षटकात 18 , डॅनिले हॅझेल 10 षटकात 51 धावा देवून 1 गडीबाद केला.जेन्नी गन हिने 10 षटकात 46 , कर्णधार हिदर नाइट गोलंदाजीची धुरा सांभाळली 7 षटकात 41 धावा देवून 2 फलंदाज बाद केले. इंग्लंडचा एकही गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करू शकला नाही.