इंग्लिश मीडियम शाळेत बक्षिस वितरण

0

भडगाव । शैक्षणिक, संस्कृतीक व क्रीडा या क्षेत्रात विद्यार्थ्याच्या होणार्‍या प्रगतीत शिक्षकांसोबत पालकांनीही आपल्या पाल्याला प्रोत्साहीत करणे तेवढेच गरजेचे आहे. असे मुख्यध्यापिका लुबना खान यांनी व्यक्त केले. येथिल चेतना इंग्लिश मेडीअम स्कूलमध्ये वार्षिक बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेत शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. यात शाळेतील विद्याथ्यानी यश मिळविले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यायाठी शाळेने बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी उपस्थित मान्यवराचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपशिक्षिका सुलेखा दास केले. सुत्रसंचलन स्मिता ठाकूर यांनी केले व आभार प्रदर्शन दीपाली कुलकर्णी यानी मानले. शिक्षक चंद्रमणी मोरे,अलताफ शेख, योगिता बागुल, पाकीजा शेख, मंदाकीणी सोनवणे यांनी परीश्रम घेतले.