इंटरनॅशनल कराटे चॅम्पीयनशीपमध्ये तायक्वांदोला सुवर्ण

0

नारायणगाव । मुंबईतील मुलुंड येथे झालेल्या 23 व्या विस्को ओपन एशियन इंटरनॅशनल कराटे चॅम्पीयनशीपमध्ये सिद्धेश गाडेकर व रोहिणी भांबरे यांना सुवर्ण पदक मिळाले असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशनचे गणेश गुळवे यांनी दिली.

नारायणगाव जवळील खोडद या गावात राहणारे हे विद्यार्थी येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात शिक्षण घेत आहेत. सिद्धेश दहावीत तर रोहिणी बारावीत आहे. या खेळाडुंना जुन्नर तालुका तायक्वांदो किक बॉक्सिंग असोसिऐशनचे गणेश गुळवे, किरण गिरी व बबलु कसबे यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत आशिया खंडातील सर्व देश सहभागी झाले होते. त्यात या खेळाडुंनी सहभाग घेत सुवर्णपदक मिळवले. या विद्यार्थ्यांची मे महिन्यात नेपाळ येथे होणार्‍या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्यावर कौतुकावर वर्षाव होत आहे.