इंटरनेट वापरकर्त्यांची मानसिकता शहामृगासारखी- शेखर पाटील

0

दैनिक जनशक्तिचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव । तंत्रज्ञानामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहामृग पक्षाला ज्याप्रमाणे जमीनीमध्ये मान लपविल्यानंतर आपल्यावर कोणाचे लक्ष नाही असे भास होते, मात्र या पक्षाचे पुर्ण शरीर दिसत असते. त्याचप्रमाणे प्रमाणे इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये आपण जे काही करतो आहे याबाबत कोणालाही काहीही कळत नसल्याचा गैरसमज असतो. परंतू परिस्थिती वेगळी असून इंटरनेट वापरकर्त्यांवर अनेक प्रणालींचे लक्ष असते असे प्रतिपादन दैनिक जनशक्तिचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांनी केले. महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र ट्रान्सफॉर्मीग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयूक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर गुन्हे सुरक्षा विषयी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

योग्य ती खबरदारी घ्या
इंटनेट वापरात तुम्ही कितीही चाणाक्ष असले तरी सायबर हल्लाला तुम्ही बळी पडू शकणार नाही. याबाबत सांगू शकणार नाही. मी सुरक्षीत आहे असे समजू नये, कारण कोणत्याही क्षणी तुमच्या सायबर हल्लेखोरांकडून हल्ले होण्याची शक्यता असते. यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. इंटरनेटचा वापरावेळी येणार्‍या अमिषाला बळी न पडता मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या म्हणी प्रमाणे जर स्वतःवर नियंत्रण ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. तसेच प्रत्येकाने चांगले ब्राऊझर निवडणे गरजे आहे. तंत्रज्ञान जेवढे सुलभ आहे तेवढेच ते घातकी आहे. याची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपण सायबर गुन्हेगारीला बळी पडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कुर्‍हाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अंगत नेमाणे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रदिप पाटील यांनी केले. तर आभार पोलीस निरीक्षक सुनिल कुर्‍हाडे यांनी मानले.

चार पटीने वाढले गुन्हे
इंटरनेटच्या माध्यमातून मानवी जीवन सुलभ झाले आहे हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबत अपुर्‍या माहिने ते धोक्यातही आले आहे. स्मार्टफोन, इंटरनेटच्या वापरामुळे प्रगती तर झालीच शिवाय गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2012 मध्ये केवळ 521 सायबर गुन्हे होते. मात्र त्यात चार वर्षात चार पटीने वाढ झाले असून सायबर गुन्हेगारीची संख्या ही 2016 मध्ये 2 हजरी 380 इतकी होती असे अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितले. महानगरीय क्षेत्रात याचे प्रमाण अधिक आहे, ग्रामीण भागात देखील याचा शिरकाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कायद्याविषयी मार्गदर्शन
भारतात व विशेषतः महाराष्ट्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. तर जिल्हास्तरावर सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारी काय आहे व ती कशी घडती याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी या गुन्हेगारीतील कायद्याबाबतही मार्गदर्शन केले. अशा स्वरुपाच्या गुन्हेगारीपासून दुर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी प्रझेंटेशनद्वारे उपस्थित माध्यम प्रतिनिधींना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देखील दिली.