जळगाव । रोटरीच्या इंटरॅक्ट क्लबमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होतो असे रोटरी मिंडटाऊनच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा मकासरे यांनी प्रतिपादन केले. रोटरी मिंडटाऊनतर्फे ओरीयन सीबीएसई स्कूलमध्ये आयोजित इंटरॅक्ट क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
नाट्य कलावंत नुपूर पांडे यांनी विद्यार्थ्यांना संवाद व खेळातून व्यक्तीमत्व विकासाच्या टिप्स दिल्या. यावेळी मानद सचिव डॉ.उषा शर्मा, मुख्याध्यापिका सुषमा कांची, आनंद खांबेटे, सुरेखा शिरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. इंटरॅक्ट क्लबची यावेळी कार्यकारणी घोषीत करण्यात आली यात अध्यक्ष प्रणव बिर्हाडे, उपाध्यक्ष स्मित वर्मा, सचिव मोहित बागुल, सहसचिव वेदश्री वाणी, तर कार्यकारणी सदस्यांमध्ये तनुश्री पाटील, यशश्री फालक, पराग कोळी, श्रुती वर्मा, आशिष पाटील, जयेश लोकचंदानी, किमया चौधरी यांचा समावेश आहे. कार्यक्रमास 300 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.