इंडिका गाडीला आग

0

लोणावळा । एका इंडीका गाडीला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कार्ला फाट्याजवळील वँकिज फार्मसमोर घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

इंडिका वाहनचालक विष्णू पाटील हे पुण्याहून लोणावळ्याकडे जात असताना अचानक गाडीच्या एसीमधून धूर येऊ लागला. हे पाहून पाटील त्वरित गाडीच्या बाहेर आल्याने जिवीतहानी टळली. गाडी मात्र जळून खाक झाली.