इंडिज क्रिकेट बोर्डाचा पाकिस्तान दौऱ्यास नकार

0

इस्लामाबाद : फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सने (एफआयसीए) सुरक्षेवरुन व्यक्त केलेल्या काळजीनंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौऱ्याचा प्रस्ताव नाकारला आहे. पाकिस्तानमध्ये जाणे धोक्याचे असल्याचा अहवाल एफआयसीएने दिला आहे. पाकिस्तानमधील धोक्याचा स्तर जास्त असून सुरक्षेसाठी फक्त अपेक्षा किंवा हमीवर अलवंबून राहणं योग्य नाही असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दोन्ही बोर्डांमधील चर्चा सुरु
वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानला अमेरिकेतील फ्लोरिडा येथे टी-20 मालिकेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले होते. याला उत्तर देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून निमंत्रण पाठवण्यात आले. यानंतर वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशनने एफआयसीएला पत्र लिहित पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थितीवर माहिती आणि सल्ला मागितला होता. मात्र फ्लोरिडामध्ये 19 आणि 20 मार्च रोजी पार पडणा-या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांवर दोन्ही बोर्डांमधील चर्चा सुरु राहणार आहे. वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर अॅण्ड्रे रसेल आणि कप्तान डॅरेन सॅमी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये 2009 रोजी श्रीलंकेन क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका झालेली नाही.