इंडियन्स मानवाधिकार संघटनेतर्फे जनजागृती सप्ताह

0

पारोळा। इंडियन्स मानवाधिकार संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीतर्फे शनिवारी 27 रोजी शासकीय विश्रामगृहात जनजागृती साप्ताह बाबत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. संघटनेतर्फे जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सहविचार सभेस महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश थोरात, दिपक भावसार यांनी जनजागृती बाबत सप्ताहाभरात करावयाच्या कामाचे नियोजन केले आहे. सांगितले. मानवी अधिकार्‍यांचे उल्लंघन बाबत समाज जागृतता किती गरजेचे आहे. समाजात समाज सेवा करणारे बरेच व्यक्ती तयार असतात परंतु त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने ते या प्रवाहात येऊ शकत नाही. या कार्यक्रमात सहभागाचे आवाहन इंडियन्स मानवाधिकार संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

संघटनेची कार्यकारिणी जाहीर
सप्ताहात तालुक्यात जाऊन त्यांना अधिकाराबाबत माहिती देेऊन त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारणी महेश थोरात यांनी जाहीर केली. जळगाव जिल्हा अध्यक्षपदी दिपक भावसार, उपाध्यक्षपदी योगेश पाटील, सचिवपदी गणेश थोरात, प्रसिद्धी प्रमुखपदी विलास चौधरी, वैशाली पाटील, वनमाला खरे, भूषण विसपुते, बाळू पाटील, राजेंद्र चौधरी, भूषण भावसार, चेतन सोनार, विश्वास पाटील, गंगाधर दुसाने, भाऊसाहेब पवार, योगेश दुसाने, संदीप महाजन, अविनाश बुंदेले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सहविचार सभेस जे.बी. पाटील, देवेंद्र पिले, मोहित ठाकूर, क्रांती देवरे उपस्थित होते.