‘इंडियन एज्युकेशनल’ला खासदार निधीतून मदत

0

वडगांवशेरी । येथील इंडियन एज्युकेशनल स्कूल या शाळेला 2 नवीन वर्ग व स्वच्छतागृह बांधण्यासाठी 20 लाख तसेच गणेशनगर येथील श्री समर्थ सेवा संस्थेला 10 लाखांची मदत खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून करण्यात आली. कार्यक्रमांचे भूमिपूजन शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार म्हणाले, संस्थेने समाजासाठी जे काम केले आहे ते खूप कौतुकास्पद आहे. उद्याची पिढी घडवण्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे.

मुलांनी गुरुजन व आपल्या पालकांचे मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखे आहे. जसे वाघिणीचे दूध पिल्याने इतकी शारिरीक ताकत येते, कुणीच हरवू शकत नाही, तसेच शिक्षणाने बौद्धिक व मानसिक ताकत येते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदीप नाईक यांनी केली त्यावेळी त्यांनी खासदारांनी खासदार निधी दिल्याने व महेंद्र गलांडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही देणगी मिळाल्याने यांचे आभार मानले. यावेळी अशोक पलांडे, चंद्रकांत पगारीया, अर्जुन नरके, अशोक सिंघल, राजू हिरेमठ, धनंजय, देशमुख, डॉ. मुकुंद दातार, मंगेश मोरे, प्रा. गोडबोले, कविता गलांडे, विशाल साळी, मोहन मातेरे, गणेश गलांडे, वैभव भुजबळ, जालू तारदाळकर, सुरेश गलांडे, आशा गलांडे, विनित वाजपेयी, जयश्री गलांडे, राहुल वाडेकर व पालक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.