इंडियन ऑइलचा सलग दुसरा विजय

0

मुंबई । मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेड आयोजित 13 व्या गुरु तेग बहादूर अखिल भारतीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत यजमानांच्या अध्यक्शिय संघाचा 2-4 असा धुव्वा उडवत इंडियन ऑईल संघाने आपली गुणसंख्या दुपटीने वाढवली. सामन्याच्या सुरूवातीपासून वर्चस्व राखणार्‍या इंडियन ऑईलचा पहिला गोल कर्णधार दिपक ठाकूरने दुसर्‍याच मिनिटाला केला.

पण या आघाडीचा आनंद इंडियन ऑइलच्या खेळाडूंना फार काळ उपभोगता आला नाही. पहिल्याच क्वार्टरमधील आठव्या मिनिटाला निखिल परदेशी पेनल्टी कॉर्नरचे गोलात यशस्वी रुपांतर करुन अध्यक्शिय संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. आक्रमक खेळ करणार्‍या इंडियन ऑईलच्या खेळाडूंनी सातच मिनिटांनी बरोबरीची कोंडी फोडून 2-1 अशी आघाडी मिळवली. सुनील यादवने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल करत संघाला पुन्हा आघाडीवर नेले. या पिछाडीनंतर अध्यक्शिय संघाने बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न केले पण गोल करण्यात यश न मिळाल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.