इंडोनेशियन ओपन सुपर सिरीजमध्ये श्रीकांत विजयी

0

जकार्ता । रविवारी भारताला पाहिली आनंदाची बातमी मिळाली. आयसीसी ट्रॉफी 2017 ची अंतीम सामना भारत-पाक संघाच्या दरम्यान होत असतांना जकार्तामध्ये होणार्‍या इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज स्पर्धेत भारताला यश मिळाले आहे. पुरूष एकेरी गटातून जिंकण्यास बॅटमिंटन खेळाडू श्रीकांत हा पाहिला पुरूष ठरला. श्रीकांतने जापानच्या काजूमासा साकाईला 21-11, 21-19 प्रमाणे विजय मिळविला असून जागतिक क्रं 22 श्रीकांत पुढील कारकीर्दीतील सर्वोच्च जागतिक क्रमवारीत अव्वल.

जपानच्या खेळाडूशी झाला सामना
24 वर्षीय भारतीय खेळाडू श्रीकांतने शनिवारी झालेल्या स्पर्धेत जागतिक प्रथम स्थानवर असलेले दक्षिण कोरीयाचा सोन वान याला नमवून अंतीम फेरीत प्रवेश मिळविला होता. श्रीकांतने दक्षिण कोरीयाचा सोन सोबत झालेल्या सामन्यात 21-15, 14-21, 24-22 याप्रमाणे मात करून विजय मिळविला होता. सदरील खेळ एक तास 12 मिनीटामध्ये गुंडाळला. जापान दुसरीकडे साकाई हा भारताचा एच.एस.प्रणीतला हरवून अंतीम फेरीत पोहचला होता. मात्र श्रीकांतच्या खेळामुळे साकाईचा टिकाव लागला नाही.

श्रीकांतने बे्रकनंतर केली मात
ब्रेकनंतर श्रीकांतने चांगली कामगिरी केली त्यामुळे सकाईला 13-13 अशी बरोबरी साधण्यात यश आले होते. दरम्यान साकाईने 19-18 अशी आघाडी घेतली होती, तेव्हा श्रीकांतने सैकयच्या अडचणींमध्ये झुंजवले आणि सामना जिंकण्यासाठी तीन सलग गुण जिंकले. श्रीकांतला सलग दुस-यांदा सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला होता. सिंगापूर खुल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ते पोहोचले होते. त्यानंतर ते साई प्रणितने गमावले होते. या विजयामुळे श्रीकांतने 2014 च्या चीन ओपन आणि 2015 च्या भारत ओपन स्पर्धेतील विजयावर आपले तिसरे सुपर सीरिज जिंकले.