पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील रिक्त झालेल्या कायदा सल्लागार व अतिरिक्त कायदा सल्लागार या पदांचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, स्मिता झगडे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचा अतिरिक्त पदभार दिला. महापालिकेत आस्थापनेवर कायदा सल्लागार आणि अतिरिक्त कायदा सल्लागार हे दोन्ही पदे मंजूर आहेत. पालिकेचे कायदा अधिकारी अॅड. सर्जेराव लावंड या पूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त कायदा सल्लागार असलेल्या अॅड. सतिश पवार यांच्याकडे कायदा सल्लागार पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.
हे देखील वाचा
सेवानिवृत्तीमुळे पदे होती रिक्त
सतिश पवार हे वयोमानानुसार शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे कायदा सल्लागार आणि कायदा अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे वकिल असलेले सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे कायदा सल्लागार आणि कायदा अधिकारी या दोन्ही पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभाग (‘झोनिपू’) असणार आहे. इंदलकर यांच्याकडील एलबीटी विभाग सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे सोपविला आहे. झगडे यांच्याकडे नागरवस्ती विभाग आणि ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाचा पदभार असणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पारित केला आहे.