इंदाणी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

0

नंदुरबार । तालुक्यातील कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.एन.पाटील होते. वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. लहान गटात प्रथम कल्याणी धनराज पवार तर मोठ्या गटात प्रथम दुर्गा आनंदा भोई पवार यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक पाटील यांनी लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद, स्वदेशी व बहिष्कार या त्रिसुत्राचा विचार मांडला. कार्यक्रमास पर्यवेक्षक एस.एन.देसले, आर.डी.पाटील, एस.जे.साळुंखे, एस.पी.पटेल, व्ही.के.पाटील, एच.क.परदेशी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. सुत्रसंचालन बी.सी.सोनार यांनी तर आभार पी.जी.पाटील यांनी मानले.