आरोग्य सभापती प्रवीण माने यांची माहिती
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी 4 कोटी 29 लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ही कामे मंजूर करण्यात आली असून पुणे जिल्हा परिषदेला निधीची कमतरता असून देखील खास बाब म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायत व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.
सरडेवाडीसाठी 35 लाख
पळसदेव काळेवाडी ते रूई मरडवाडी रस्त्यासाठी 25 लाख, शिरसोडी ते कालठण नंबर 2 साठी 25 लाख, सणसर ते कुरवली ते तावशी भुईटेवस्तीसाठी 22 लाख, बोरी ते सणसर 39 फाटा रस्ता दुरुस्तीसाठी 35 लाख, वरकुटे खुर्द वडापुरी गलांडवाडी सरडेवाडी ते राष्ट्रीय महामार्गासाठी 35 लाख, इंदापूर-बावडा बागल फाटा रस्ता 22 लाख, विरवाडी भिगवण रस्ता 40 लाख, न्हावी बोराटवाडी कौठळी रस्ता 50 लाख, बावडा ते फुलेवस्ती 20 लाख, बोरी ते वाघमोडेवस्ती 50 लाख, वडापुरी अवसरी रस्ता 35 लाख, शेळगाव स्टँड ते निमसाखर 20 लाख, अंथुर्णे भरणे 50 लाख तसेच जिल्ह्यातील इतर 20 रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माने यांनी दिली.