इंदापुरात समता सैनिक मेळावा – युवराज मस्के

0

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ हे इंदापुर तालुक्याच्या दौर्‍यावर येणार असले बाबतचा शब्द खुद्द छगन भुजबळांनी दिला असून पुढील काही दिवसात इंदापुर येथे समता सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवराज मस्के यांनी इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

छगन भुजबळ हे सांगोला जि. सोलापूर येथे समता सैनिक मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून अकलुजकडे जात असताना त्यांचे इंदापूर येथील बाह्यवळण अकलुज चौक येथे आगमन झाले. यावेळी इंदापुर तालुका वासियांच्या वतीने भव्य स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, इंदापूर नगरपरिषद विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, छत्रपतीचे संचालक गणेश झगडे, कर्मयोगीचे संचालक अतुल व्यवहारे, वसंतराव मोहळकर यांच्या हस्ते करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करताना मस्के यांनी इंदापुर तालुक्यात समता सैनिक मेळावा आयोजित करण्याचा मानस असून सदर मेळाव्यास उपस्थित राहण्याची विनंती केली. त्याबाबत मेळाव्याच्या कामाला लागा,आम्ही नक्की येणार असल्याचे आश्‍वासन भुजबळ यांनी दिले.