इंदापूरच्या नगराध्यक्षांनी दिले स्वच्छतेचे धडे

0

स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू : शहा यांनी केली परीसराची साफसफाई

इंदापूर : स्वच्छता कर्मचारी व महीलांसोबत सहभागी होऊन शहर स्वच्छ करण्याचा निर्धार इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकीता शहा यांनी केला. परीसर स्वच्छ करण्यासाठी त्या स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. परीसर स्वच्छ करत सर्वांना स्वच्छतेचे धडे दिले.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छता मोहीमेच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर तसेच अण्णाभाऊ साठेनगरमधील वार्ड क्र. 5 मध्ये नगराध्यक्ष अंकिता शहा, आरोग्य सभापती राजश्री मखरे यांनी महीला स्वच्छता कर्मचारी, नागरिकांसमवेत स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. या मोहीमेंतर्गत बुध्द विहार आणि परीसराची स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छता अ‍ॅपबाबत जनजागृती

इंदापूर नगरपरिषदेने 2018 च्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करीत देश पातळीवर आपला ठसा उमटविला. त्यामुळे नगरपरिषदेला 5 कोटींचे बक्षिस मिळाले. आता नगरपालिकेने यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा चंग बांधला आहे. वार्ड ऑफिसर योगेश सरवदे आणि भागवत मखरे, यांनी या प्रभागात घरोघरी जावून स्वच्छता अ‍ॅप आणि जादुई टोकरीची महीलांना माहिती दिली. तसेच नागरिकांचा सहभाग उस्फुर्तपणे वाढविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. यावेळी शिवाजी मखरे, अ‍ॅड. किरण लोंढे, शुभम मखरे, तेजस मखरे, सिद्धार्थ मखरे उपस्थित होते.