पुणे । इंदापूर तालुक्यातील लाकडी, काझड, शिंदेवाडी, वकिलवस्ती आणि बावडा या ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या 5 पैकी 3 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. लाकडी आणि काझड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सरपंच निवडून आले आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीवरही आमदार भरणे यांनी दावा केला असून, पक्षात दोन गट पडल्यामुळे सरपंचपदाच्या उमेदवाराचा केवळ 10 मतांनी पराभव झाला आहे. सध्या सरपंचपद विरोधी पक्षाकडे असले, तरीही बहुमत राष्ट्रवादीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.
वकास विरोधकांना सलतो
गेल्या 20 वर्षांपासून तालुक्याचा खुंटलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गतिमान झाला आहे. तालुक्यातील काझड, लाकडी, शिंदेवाडी ही गावे आजही राष्ट्रवादीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिली असून, परिवर्तनाची नांदी खर्या अर्थाने रुजली आहे. विरोधक बहुमताचे राजकारण करत आहेत. तालुक्यात 4 वर्षांत आलेला निधी आणि त्यातून तालुक्याचा झालेला विकास विरोधकांना सलत आहे, असे आमदार भरणे म्हणाले. गावागावातील गट-तट बाजूला ठेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन करत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता भरणे यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली