इंदापूर । राज्याचे माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात बुधवारी (दि. 23) भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. या प्रक्रियेसाठी वेबसाईट तयार करण्यात आली असून शहा सांस्कृतिक भवन येथे एका विशेष समारंभामध्ये त्याचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, नगरसेवक कैलास कदम, प्रा. गौतम यादव उपस्थित होते. दरम्यान, ुुु.ेपश्रळपशळपवर्रिीी.लेा या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
मॅन्युफॅक्चरींग, बँकींग, फायनान्स, बीपीओ, केपीओ, आयटी, ट्रेनिंग, सेक्युरीटी, अॅग्रीकल्चर क्षेत्रातील 45 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणीचा प्रयोग यशस्वी होईल व अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल, अशी आशा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. युवकांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव मुकुंद शहा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.