राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीत मागणी
बारामती : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंदापूरची जागा महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्षाला सोडावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी प्रमुख व पदाधिकार्यांच्या बैठकीत करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विश्रामगृहात रासपची बैठक आयोजित केली होती. बैठकीस प्रदेश सचिव डॉ. अर्चना पाटील, प्रदेश प्रवक्ते विष्णू चव्हाण, राज्य कार्यकारणी सदस्य विनीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, शहराध्यक्षा उमाताई मखरे, निर्मला शिंदे, तालुका अध्यक्ष उत्तम जाधव, सतिश तरंगे, बजरंग वाघमोडे, संदीप गोफणे उपस्थित होते.
बारामती लोकसभा प्रभारी बापूराव सोलनकर म्हणाले, बारामती लोकसभा निवडणूक रासपचे संस्थापक व राज्याचे पशू दुग्ध मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. रासप हा सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन पक्षपातळीवर संधी दिली जाणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये रासप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी ‘गाव संपर्क अभियान, घर तेथे रासप’ असे अभियान राबवावे.