येरवडा : इंदिरानगर भागातील अखिल आदर्श इंदिरानगर मित्र मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. माजी महापौर स्वर्गीय भारत सावंत यांचे हा उत्सव साजरा करण्यामध्ये मोठे योगदान होते.
विश्रांतवाडी-आळंदी मार्गावरील इंदिरानगरमधील नागरिकांनी एकत्र येऊन परिसरातील विविध प्रश्न मार्गी लागावेत व सामाजिक कार्य घडावे, या उद्देशाने सावंत यांनी अखिल आदर्श इंदिरानगर मित्र मंडळ व भारतनगर येथे अष्टविनायक मित्र मंडळाची 1980-81च्या दशकात स्थापना केली. मंडळाच्या माध्यमातून बारा ही महिने येणारे विविध सण उत्साहात साजरे करण्यात येतात. मंडळाचे सध्याचे अध्यक्ष अजय सावंत हे आहेत. मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम पार पाडले आहेत. विशेषत: महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी 6 फुटी गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून गणराय हे सिंहासनावर विराजमान झाले असून गणरायाच्या दोन्ही बाजूस चार सिंहाच्या मूर्त्या असून त्यावर भारतमाता देशाचा झेंडा उंचावत आहे. युवक व महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करून विजेत्या स्पर्धकास बक्षिसांचे वाटप करण्यात आले यावर्षी देखील सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. -फोटो ओळ येरवडा : अखिल आदर्श इंदिरानगर मित्र मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा अजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.