इंदिरा आवास योजनेत अपहार; तिघांना शिक्षा

0

जळगाव । पारोळा तालुक्यातील खेडी बु॥ येथील तात्कालीन ग्रामसेवक, माजी सरपंचासह एकाने ग्रामपंचायतीस इंदीरा आवास योजना आणि ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानीत रकमेत अपहार केल्याप्रकरणी बीडीओ यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. तात्कालीन ग्रामसेवक ज्ञानेश्‍वर देवराम पाटील, माजी सरपंच वसंत चुडामण पाटील आणि लालसिंग शंकर पाटील अशी आरोपींची नावे आहेत.