इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय वडनेर येथे राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्य वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

 हिंगणघाट /भुसावळ प्रतिनिधी दि 21

वडनेर येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नेहरू युवा केंद्र वर्धा तथा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्य वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे म्हणून इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.शरदजी ढाले हे लाभले तर प्रमुख पाहुणे म्हूणन प्रा. गजाननजी इंगळे उपस्थित होते,

परीक्षक म्हूणन प्रा. मंजुषा महाजन ,प्रा.स्मिता लाहोरे तसेच युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था चे संस्थापक अध्यक्ष राहुल दुरतकर यांची उपस्थिती होती.

हिंदी भाषेचे महत्व व स्पर्धेची रूपरेषा प्रास्ताविक भाषाणातून राहुल दुरतकर यांनी मांडली. त्यानंतर स्पर्धाकांचे भाषणे घेण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेत एकूण 25 स्पर्धेकांनी सहभाग नोंदवीला होता. तर यामध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री आंबटकर, द्वित्तीय क्रमांक दलाल

तृतीय क्रमांक रिया पचारे यांनी मिळवीला. या विद्यार्थ्यांना नेहरू युवा केंद्र वर्धा तर्फे स्मृतीचिन्न भेट देऊन सन्मान करण्यात आला.

हिंदी भाषा महत्वाची असून ती युवकांनी मातृभाषा प्रमाणे रोजच्या जीवनात अंगीकरावी असे मत अध्यक्षीय भाषानातून प्रा. शरदजी ढाले यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.