चोपडा । भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेविका सुरेखा माळी यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व आज देशात जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून बाहेर येण्यासाठी इंदिराजींच्या कणखर विचारांची देशाला नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी यावेळी केले.
इंदिरा गांधींच्या प्रतिमा पूजन
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, सुरेश पाटील, शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, विनायकराव सोनवणे, नंदकिशोर सांगोरे, डॉ अशोक कदम, के.डी.चौधरी, ए.टी.पाटील, अॅड जे.आर.पाटील, नगरसेविका सुरेखा माळी, आरीफ सिद्दीकी, राजेंद्र पाटील, धनंजय पाटील, बाळू कोळी,गणेश पाटील, अरूण कंखरे, कांतीलाल सनेर, संदिप सोनवणे, रमाकांत सोनवणे, दिलीप साळुंखे, राजेंद्र सुकदेव सोनवणे, मोतीराम माळी, साठे सर, सुधाकर बाविस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.