भोपाळ । इंदिरा गांधी यांनी राजीव आणि संजयनंतर ज्याला आपला मुलगा मानले तोच भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मध्यप्रदेशात ज्या नेत्याच्या खांद्यावर पुढील निवडणुकींची धुरा सोपवण्याचा काँग्रेस नेतृत्व विचार करत आहे. त्या कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे राहुल गांधीसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यातही भाजप प्रवेशाची चर्चा लगातार वाढत असल्याने राहुल गांधी अस्वस्थ होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.