जळगाव: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक काम वगळता घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यामुळे घरी करमणूक म्हणून विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. दरम्यान आता निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी फेसबुक live च्या माध्यमातून कीर्तन करावे अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. सोशल मीडियाचा वापर करून किर्तनाद्वारे समाज प्रबोधन केल्यास केल्यास कोणीही घर सोडणार नाही असे म्हटले जात आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या विनोदी शैलीने प्रसिद्ध आहेत. तरुण पिढीला कीर्तन नकोसे वाटते परंतु इंदुरीकर महाराजांच्या खास शैलीने तरुणांनाही कीर्तनाची भुरळ पडते. मध्यंतरी त्यांच्या एका वक्तव्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. परंतु त्याही वेळी त्यांच्या मागे मोठा समर्थक वर्ग उभा होता.