इंदूर । तीन टी 20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील कटक येथील पहिला सामना जिंकल्यानंतर शुक्रवारी होणारा दुसरा सामनाही जिंकून इंदूरमध्येच मालिका जिंकण्याच्या इर्याद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. त्याचवेळी पाहुणा श्रीलंकेचा संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार हे निश्चित आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चढाओढीत क्रिकेटप्रेमींना चांगल्या खेळाची मेजवानी मिळू शकते. कटक पहिला टी 20 सामना भारताने 93 धावांनी जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट मालिकेप्रमाणे टी 20 क्रिकेट मालिकाही जिंकून देणे हे भारतीय संघाचा हंगामी कर्णधार रोहित शर्माचे पहिले लक्ष्य असेल. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे दुसर्या सामन्यासाठी संघात बदल होण्याची फार कमी शक्यता आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
श्रीलंका : निरोशन डिक्वेला, उपुल थरंगा, कुशल परेराम अँजेलो मॅथ्यूज, असेल गुणरत्ने, दासून शनाका, थिसारा परेरा (कर्णधार), अकिला धनंजय, दुष्मंत चमीरा, विश्व फर्नांडो, नुवान प्रदीप.