जळगाव। ‘इंदू सरकार’ या चित्रपटात दिवंगत पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आलेली आहे, या चित्रपटातून मधुन भांडारकर भाजपाच्या इशार्यावर जनतेला बदनामीकारक माहिती देण्याचा प्रयत्न केले असल्याने या चित्रपटाचा कॉग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. शुक्रवारी 28 रोजी सकाळी 9 वाजता कॉग्रेसतर्फे नटवर चित्रपटगृह व खान्देश सेंट्रल येथील ऑयनॉक्स चित्रपट गृहातील 9 वाजता प्रसारीत होण्यार्या शो बंदी आणुन आंदोलन करण्यात आले.
कॉग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहातील पोस्टर्स फाडले तसेच चित्रपट बघण्यासाठी आलेल्यांना चित्रपट बघण्यापासून रोखले. आंदोलन करतांना कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, कॉग्रेस महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, डी.जी.पाटील, एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष देवेंद्र मराठे, वाय.बी.घोडेस्वार, मयुर पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या इशार्यावरुन
दिग्दर्शक मधुर भांडारकर भाजपा सरकारच्या इशार्यावरून ’इंदू सरकार’ या चित्रपटातून दिशाभूल करुन मांडण्याचा प्रयत्न करित असल्याचे सांगण्यात आले. देशाच्या एका दिवंगत पंतप्रधानाच्या दैदिप्यमान कारकिर्दीला झाकोळण्यात आले आहे. निव्वळ गैरहेतू ठेवून महत्तम व्यक्तीचे चारित्र्य हनन करणार्या या चित्रपटातून अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली मधुर भांडारकराचा ’इंदू सरकार’ हा प्रायोजीत प्रकार देशाची जनता कदापी सहन करणार नाही. काँग्रेसचे निष्ठावान सैनिक म्हणून आम्ही मधुर भांडारकर यांच्या ’इंदू सरकार’ चित्रपटाचा निषेध करत असल्याचा सांगितले.
इंदिराजींचे कार्य महान
स्व.इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या, गरीब, मजूर, शेतकरी, मध्यम वर्गीय, दलित, अल्पसंख्यांक, सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी अनेक योजना राबवल्या. 1971 साली पाकिस्तानला धडा शिकवत बांगलादेशाची निर्मिती केली. माजी पंतप्रधान अटलजींनी सुद्धा संसदेत जाहीरपणे त्यांच्या कार्याचा कौतुक केला होते. देशाच्या एकात्मता, अखंडतेसाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले. अशा जागतिक किर्तीच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेसचे नेते स्व.संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी अपप्रचार करणे निंदनीय असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
आंदोलकांची घोषणाबाजी
यावेळी बंद करो, बंद करो इंदू सरकार बंद करो, राहुल गाधी आगे बढो, सोनिया गांधी आगे बढो, मधुर भांडारकर हाय हाय, नही चलेगी नही चलेगी इंदू सरकार नही चलेगी, अशा घोषाणा देण्यात आल्या. चित्रपटगृहाबाहेर असलेले बॅनर फाडले, त्यानंतरचे शो देखील बंद करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात घुसण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना रोखण्यात आले.