इंदोरी : मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंकुश ढोरे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कीर्ती पडवळ होत्या. उपसरपंच पदासाठी अंकुश ढोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक वाय. बी. डोळस यांनी ढोरे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
यावेळी निरीक्षक सोनवणे, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, तालुका भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी सरपंच मधुकर ढोरे पाटिल, साहेबराव काशिद, इंदोरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप ढोरे, शहर भाजपाचे अध्यक्ष जगन्नाथ शेवकर, माजी सरपंच दामोदर शिंदे, संदीप काशिद, प्रदीप काशिद, इंदोरी तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक राऊत, बबनराव ढोरे, बाळा घोजगे, आशिष ढोरे, मंगेश ढोरे, ऋषिराज लोंढे आदी उपस्थित होते.