इंद्रप्रस्थनगरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

जळगाव । येथील इंद्रप्रस्थनगरात मागील नवीन कानळदा रोड परिसरातील शिवशंकर कॉलनीमधील नाला फुटल्याने दूषितपाणी साचून नागरिकांना आरोग्य धोक्यात आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा संदीप महाले, ललित कोतवाल, भूषण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अतिश बारसे, रुपेश पाटील, सचिन पाटील, सागर कुटुंबळे केशव जोशी, दिपक सोनवणे, दुर्गेश ठाकुर, योगेश गवळी, भूषण राऊत स्वप्नील नेरकर, दुर्गेस सन्यास, भिमा पवार यांनी दिला आहे.

ऑईलमिलच्या सांडपाण्याचा होतोय त्रास
रस्त्याला कडेला दूषित पाण्याचा नाला असून या नाल्यामध्ये ऑईल मिलचे सांडपाणी सातत्याने येत असते. रोडलगत मोठे पटांगण आहे. त्यामुळे पाण्याचा ओढा जोरात असून तो नाला तीन ते चार दिवसात फुटत असतो व त्या नाल्याचे पाणी मैदानात शिरत असते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. या दिवसात मच्छर तसेच साथीचे आजाराने प्रमाण वाढत आहे.

पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे हाल
पाण्याची पाईपलाईन काही प्रमाणात फुटलेली आहे. पिण्याचे पाणी येते. त्यावेळेस फुटलेल्या पाईपातून भरपूर पाणी वाया जाते. त्याचबरोबर फुटलेल्या पाईपलाईन पुढील भागात पाणी पुरवठा खंडीत होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हाल होत असून मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे.