मुंबई । शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री इंद्राणीची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर कारागृह प्रशासकाने तिला तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले आहे. इंद्राणी मागील अडीच वर्षांपासून तुरुंगात आहे. इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय कोर्टाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे
इंद्राणीची प्रकृती सध्या स्थिर!
इंद्राणीची प्रकृती सध्या स्थिर असून ती नेमकी कोणत्या गोळ्यांचे सेवन करते, हे पाहण्यासाठी तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले आहे. शीनानंतर इंद्राणीने रचला होता तिचा भाऊ मिखाइलच्या हत्येचा कट. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ऑगस्ट 2015 मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक झाली होती.