खासदार साबळे : आळंदीत दिव्यांग निधीचे वाटप
आळंदी । आळंदी, देहू पंढरपूर भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. इंद्रायणी नदी नमामि गंगेच्या धर्तीवर प्रदूषण मुक्त करण्याची गरज असल्याचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले.आळंदी नगरपरिषद दिव्यांग विभागाच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आयोजित महिला मेळावा, बचत गटांना फिरता निधी तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना खासदार अमर साबळे यांच्या हस्ते निधीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर, गटनेते पांडुरंग वहिले, नगरसेविका सविता गावडे, स्मिता रायकर, प्राजक्ता घुंडरे, पारुबाई तापकीर, मीरा पाचुंदे, प्रतिमा गोगावले, नगरसेवक बालाजी कांबळे, सचिन गिलबिले आदी मान्यवर उपस्थित होते.
5 लाखांचा निधी वाटप
नगरपरिषद दिव्यांग विभागाच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना 5 लाखांचा निधी तसेच महिला व पुरुष, बचत गटांना फिरता निधी असा 1 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार गौतम पाटोळे, भानुदास पर्हाड, अर्जुन मेदनकर, श्रीकांत बोरावके यांचा सत्कार झाला. छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार साबळे यांनी यावेळी दिले. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आळंदीत राबविला जाईल, मांस व दारू विक्री उघड्यावर तसेच अवैध धंदे तीर्थक्षेत्रात नसावीत, असे त्यांनी पुढे सांगितले. प्रास्ताविक नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी तर आभार उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी मानले.