पिंपरी चिंचवड : पिंपरीतील इंद्रायणी को. ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सीए मनोज अगरवाल, तर उपाध्यक्षपदी अॅड.रामहरी कसबे यांची निवड करण्यात आली. बँकेच्या झालेल्या सभेत निवडणुक पार पडली. मावळते अध्यक्ष अॅड. एस.बी चांडक यांनी पदाची सूत्रे नवीन अध्यक्ष सीए अगरवाल व अॅड. कसबे यांच्याकडे सोपवून त्यांचा सत्कार केला. यावेळी मावळते उपाध्यक्ष अरूण शिनकर, सीए महेश चांडक, सुरेश जुमानी, पोपट पवार, सीए बालाजी पेन्सलवार, लक्ष्मण गिरी, अॅड. पद्मजा शिंदे, सुवर्णा झोळ, गोविंद दरगड, शहाजी पडलगरे आदी संचालकांसह सीईओ अनिल दोशी, सहाय्यक महाव्यवस्थापक विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. बँकेच्या 164 कोटी ठेवी तर कर्ज 90 कोटी आहे. उलाढाल 250 कोटी पेक्षा जास्त आहे. 7 शाखा कार्यरत आहे. स्थापनेपासून बँकेचा ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी पिंपरी शाखेत ‘ई’ गॅलरी सुरु केली असून रक्कम काढणे, रक्कम भरणे, पासबूक प्रिंट करणे या सुविधा 24 तास पुरविल्या जातात.