इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा

0

वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्यांना गुलाबपुष्प
तळेगाव दाभाडे :तळेगाव येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी स्वागत केले. सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्रा. बी. के. रसाळ, प्रा. डी. पी. काकडे, प्रा. आर. आर. भोसले, नॅक समन्वय प्रा. के. व्ही. अडसुळ, प्रा. एम्. व्ही. देशमुख, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. एस्. आर. थरकुडे, डॉ. एस. एस. मेंगाळ, जनसंपर्क अधिकारी प्रभाकर तुमकर आदी उपस्थित होते.

विविध विषयांवर मार्गदर्शन
तसेच प्रा. डी. पी. काकडे यांनी वाणिज्य विभागातील अभ्यासक्रमाचा उलगडा करुन विविध विभागातील संधीची माहीत दिली. प्रा. के .व्ही. अडसुळ यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य विभागातील विविध सर्टिफिकेट कोर्सची माहीती देवून स्पर्धा परीक्षेत वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्या अनूषंगाने महाविद्यालयात स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध असून त्याचा फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक प्रा. डी. पी. काकडे यांनी केले. सूञसंचालन प्रा. पी. के. पानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. आर. भोसले व वाणिज्य विभागातील प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.