इंद्रायणी स्वच्छतेसाठी शासन निधी देण्याची गरज

0
आळंदी :  तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीचे स्वच्छतेस राज्य,केंद्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भाविक-नागरिकांतून होत आहे. नद्यांचे प्रदूषणास जबाबदार असलेल्या व्यक्ती, संस्था, कारखाने यांच्यावर कारवाईचे संकेत शासनाकडून देण्यात आले आहेत.
पवित्र नद्यांमध्ये कचरा, राडारोडा टाकण्यास मनाई आहे. इंद्रायणी नदीसह देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचा प्रश्‍न देखील आता ऐरणीवर आला आहे. वाढत्या नदीचे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी गंगा विधेयक 2017 तयार केलं आहे. यात गंगा प्रदूषित करणार्‍यांवर,तिचा प्रवाह अडवणार्‍यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच दंड वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास नदीसुधार प्रकल्पासाठी कायदा करणारा देश भारत पहिला ठरेल.