इंधनबचतीसाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी

0

नवापूर । डिजेल व पेट्रोल हे नैसर्गिक संपती असून ती संपणारी आहे, त्यात वाढ करु शकत नाही. पेट्रोल जन्य वस्तु संपल्या तर सर्व वाहने जागेवर थांबतील तरी याची संपुर्ण देशातील नागरीकांनी दक्षता घेणे काळाची गरज असल्याचे मत वनिता विद्यालयाचे शिक्षक शिक्षक बी.पी. जाधव यांनी व्यक्त केली. नवापूर एस.टी.आगार येथे 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान इंधन बचत मासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

इंंधन बचत कार्यक्रमाचा निमिताने त्यामध्ये अधिक भर घालण्याचे आहवान केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्‍वर पवार यांनी केले तर आभार वसंत गावीत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.बी.अहिरे, भावीन पाटील, संजय शिंदे, यु.एस.गावीत, आर.आर.गावीत, राजु पार्दी यांनी परीश्रम घेतले.

चालकाची भूमिका महत्त्वाची
यावेळी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, सहायक कार्यशाळा अधिक्षक के.एस.साळुखे, विभागीय अभियंता बाविस्कर, नाना भामरे, व्ही.एस.वळवी आदी उपस्थित होते. यावेळी बी.पी.जाधव यांनी डिझेल बचत साठी प्रत्येक चालकाने तांत्रिक बाबीचा उपयोग करणे महत्वाचे आहे. तसेच रेल्वेगट जास्त कालवधी साठी बंद राहत असेल तर गाडीचे इंजिन बंद केले तर नक्कीच डीजेलची बचत होईल असे सांगितले. या नंतर आगार प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी गत सहा महिन्या पासुन संघीक प्रयत्नाने नवापुर आगाराचा केपीटीयलमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.