भुसावळ राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन : जिल्हाभरातील पदाधिकार्यांचा सहभाग
भुसावळ- इंधन दरवाढीच्या भडक्या विरोधात राज्यभरात राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू असून शनिवारी भुसावळातील पदाधिकार्यांनी जिल्हाभरातील पदाधिकार्यांना सोबत घेत राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून दुचाकी प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत लोटत केंद्रासह राज्य सरकारचा निषेध केला तर भुसावळातील खड्डेमय रस्त्यांवर पाण्याचे तळे साचल्याने पदाधिकार्यांनी आंदोलनादरम्यान या खड्ड्यांसोबत सेल्फि काढल्याने राष्ट्रवादीच्या या आंदोलनाची शहरात दिवसभर जोरदार चर्चा राहिली.
केंद्रासह राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी
शनिवारी दुपारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमले. दोन दुचाकींना लोटत पदाधिकार्यांनी केंद्रासह राज्याच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरुवात झाली. शहर पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलक आल्यानंतर रस्त्यावर भल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांच्यासह युवकचे पदाधिकारी उज्ज्वल पाटील यांनी ‘खड्डे विथ सेल्फि’ काढल्याने रस्त्यावरून जाणार्या-येणार्यांचीही भुवया उंचावल्या तर पदाधिकार्यांच्या या अनोख्या आंदोलनीची चांगलीच चर्चा राहिली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार केंद्रासह राज्य शासनाने इंधन दरात केलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दरवाढ तातडीने कमी करावी शिवाय शेतकर्यांच्या पीक विम्याच्या नुकसानीचे पंचनामे होवूनही मदत अद्यापपर्यंत मिळालेली नाही, बोंडअळीचे अनुदान शेतकर्यांना पन्नास तर काहींना शंभर रुपये मिळाले आहे. शेतकर्यांची शासनाने चेष्टा चालवली असून या बाबीचा राष्ट्रवादी निषेध करते. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रदेश सदस्य पोपटराव पाटील, तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नाना पवार, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, वरणगाव नगरपालिका गटनेता राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, सुभाष चौधरी, विलास पाटील, तालुका उपाध्यक्ष बुटासिंग चितोडीया, पवन मेहरा, नीलेश निमसे, मंगेश पाटील, अनिल पाटील, सागर दोंडे, सुधाकर चौधरी, दिनेश चौधरी, विलास पाटील, राजेश महाजन, गणेश पाटील, दामोदर राजपूत, रवींद्र पारधी, दीपक मराठे, देविसिंग चितोडी, प्रेमसिंग चितोडीया, ज्वालासिंग चितोडीया, रवी चितोडीया, प्रदीप कोळी, लखन चौधरी, नीलेश कोलते, राहुल मावसेकर, विलास पाटील, गजानन पवार, शंकर मस्कावदे, तुषार हडप आदींच्या स्वाक्षर्या आहेत.