पेट्रोल दर वाढीबाबत राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
यावल- राज्यात पेट्रोल दरवाढीचा भडका दिवसागणित वाढत असून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गेल्या चार वर्षात 50 टक्क्यांनी कमी झाले असतानाही राज्यात मात्र पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचा निषेध राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांनी करीत तहसीलदारांना सोमवारी निवेदन दिले. पेट्रोल बरोबरच डिझेलच्या सुद्धा किंमती वाढल्याने अप्रत्यक्षपणे महागाई वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव कमी असताना देशात मात्र दररोज भाव वाढत आहे यातील पारर्शकता अद्यापही जनतेला दिसून आलेली नाही. पेट्रोलच्या किंमती वाढवून सरकारने जनतेच्या डोळ्या धुळफेकिचे काम केले आहे. पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना सतत दर वाढ करुन जनतेची अर्थिक लूट केली जात असून ती तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ललित बागुल, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नाना साठे, तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, युवक अध्यक्ष देवकांत पाटील, गुणवंत नीळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष, कुलदीप पाटील, सोशल मिडीया सेलचे जिल्हा उप समन्वयक राजेश करांडे, शहर युवक अध्यक्ष विनोद पाटील, सोशल मिडीया तालुका अध्यक्ष अतुल बडगुजर, सीताराम पाटील, एम.बी.तडवी, नरेंद्र पाटील, निर्मल पाटील, राकेश सोनार, किशोर माळी, दीपक पाटील, नरेंद्र शिंदे, अनिल कोळी, दीपक येवले, निसार तडवी, शशिकांत पाटील, डी.के.पाटील, परेश साठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व फ्रंट अध्यक्ष उपस्थित होते.