नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल 31 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 44 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 86.56 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 75.54 झाला आहे. याआधी मुंबईत 29 मे रोजी मुंबईत पेट्रोलचा सर्वाधिक दर म्हणजेच प्रतिलिटर 86.24 इतका होता.
राजधानी दिल्लीत पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 39 पैशांनी प्रतिलिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 79.15 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 71.15 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.