इंधन दरवाढीचे विघ्न कायम; आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र काल एका दिवसाच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा इंधानांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या किमतीत 13 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 11 पैशांनी वाढ झाली. परिणामी, मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना 88.39 रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 77.58 रुपये द्यावे लागतील. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 81.00 रुपये झाला आहे, तर डिझेल प्रति लिटर 73.08 रुपये झाले आहे.

सलग सतरा दिवसांच्या दरवाढीनंतर बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे आणि देशातील ५ राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलच्या किंमतींवर केंद्र सरकार नियंत्रण करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही.