नंदुरबार : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नंदुरबार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुभाष चौकातील पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरायला येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे अच्छे दिन आल्याचे म्हणत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणं मुश्किल झाले आहे. पेट्रोल, घरगुती गॅसवरील अधिभारने तर कहरच केला आहे. शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने सुभाष चौकातील पेट्रोल पंपावर घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी, युवक काँग्रेसचे नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मोहित सिंग राजपूत, नगरसेवक परवेज खान, राजेंद्र माळी, विलास रघुवंशी, विजय माळी ,वाल्मीक राजपूत, ललित पाटील, जगदीश वसईकर ,अर्जुन सिंग राणा, अविनाश माळी, भावेश मराठे,नरेश पवार, कृष्ण कुवर, योगेंद्र गिरासे,विक्की राजपूत, गणेश पाटील, सुभाष भामरे, जीतू पान पाटील, राहुल वाघ ,राहुल कासार, योगेश राजपूत ,लल्ला मराठे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.