इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने
भुसावळात केंद्र सरकारविरोधात पदाधिकार्यांची जोरदार घोषणाबाजी : वाहनधारकांना गुलाबपुष्प देत केंद्र सरकारचा निषेध
भुसावळ : पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी भुसावळ शहरातील काँग्रेस पदाधिकार्यांसह भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रसंगी वाहनधारकांना गुलाबपुष्प देवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला तर रावेरातील पदाधिकार्यांनी तीन पंपावर जावून निदर्शने केली. प्रसंगी इंधन दरवाढ रोखण्यासंदर्भात तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
भुसावळात केंद्र सरकारविरोधात निदर्शने
शहरातील काँग्रेस पदाधिकार्यांनी यावल रोडवरील राष्ट्रवादी महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करीत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्री मोदी सरकारविरोधात पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, संजय खडसे, सुखदेव सोनवणे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलिम गवळी, तालुकअध्यक्ष अकिल शहा, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, मुख्याध्यापक हमीद सर, जॉनी गवळी, शहर उपाध्यक्ष महेंद्र महाले, महिला जिल्हा उपाध्यक्ष राणी खरात, हमीद गवळी, महिला शहर उपाध्यक्ष वंदना चव्हाण, ललित सपकाळे, विनोद धांडे, भुसावळ विधानसभा युवक अध्यक्ष इमान खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.