इंधन दरवाढीविरोधात ‘फेकू बॅंकेद्वारे इंधनासाठी कर्जवाटप’ आंदोलन

0

पुणे :- सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत चालली आहेत. सलग दहाव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज (बुधवार) पुन्हा 30 पैशांची वाढ झाली असून पुणे शहरातील पेट्रोलचे दर 84.84 तर डिजेल 71.60 रुपये झाले आहे. या दरवाढीविरोधात जगंलीमहाराज मार्गावरील साई सर्व्हिस पेट्रोलपंप येथे ग्राहक हक्क संघर्ष समीतीतर्फे ‘फेकू बॅंकेद्वारे इंधनासाठी कर्जवाटप’ आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल भरणे अवघड झाल्याने इंधनासाठी कर्ज
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की आज गाडी घेणे सोपे झाले आहे. परंतु पेट्रोल भरणे अवघड झाल्यामुळे आता नागरिकांना इंधनासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे, असे ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंद राजहंस म्हणाले. त्याचा निषेध म्हणून त्यांना आता सरकारच्या फेकू, जुमला, मनकी बात बॅंक, चायपे पेट्रोल बॅंक, बुरे दिनवाली बॅंकतर्फे कर्ज वाटप करण्यात येत असून त्यासाठी लोकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहे. तर या दरवाढीला जबाबदार असलेल्या मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आले. तसेच त्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अनेक नागरिकांनीही या पेट्रोल दर वाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.