इंधन दरवाढीविरोधात भुसावळ विभागात निदर्शने

भुसावळसह यावल व रावेरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन : केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

भुसावळ : पेट्रोलसह डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भुसावळसह विभागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली तसेच तहसील व प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आली. केंद्र शासनाने वाढत्या महागाईवर तातडीने नियंत्रण मिळवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भुसावळसह रावेरात प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली तर यावल शहरात पदाधिकार्‍यांनी वाहने ढकलत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.

भुसावळात प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
भुसावळात देशातील इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रणजीत चावरीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल ठोके, तुषार चौधरी, विजय भंगाळे, सचिन पाटील, सिद्धार्थ पगारे, समीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, राजीव भोई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावल शहरात वाहने ढकलत महागाईचा निषेध
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी बैठक झाली. बैठकीनंतर पदाधिकार्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकलत यावल तहसील कार्यालयांपर्यंत आणली. यावेळी नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावल येथे निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील, शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, समाधान पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार, राहुल चौधरी, धनराज पालक, समीर तडवी, विजय भोई, भरत भोई, छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील, तात्या कोळी, यशवंत अडकमोल, युवराज भास्कर पाटील, कैलास अडकमोल, चंद्रकांत कोळी, मुस्तुफा तडवी आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.