इंधन दरवाढीविरोधात यावलला काँग्रेसचा रास्ता रोको

0

यावल:- शासनाने पेट्रोल व डिझेलचे वाढविल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणावरील भाववाढीच्या विरोधात गुरूवारी तालुका काँग्रेस कमेटीतर्फे भुसावळ टी पॉईंटवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील वर्दळीचा मार्ग असलेल्या भुसावळ टी- पॉईन्ट वर गुरूवारी सकाळी 11 वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
रास्ता रोको आंदोलनात माजी आमदार रमेश चौधरींसह जिल्हा परीषदेचे काँग्रेसचे गटनेता तथा तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, शहराध्यक्ष कदीर खान, बाजार समितीचे माजी सभापती केतन किरंगे, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, फैजपूर शहराध्यक्ष कौसर अली, हाजी गफ्फार शाह, विवेक सोनार, बारसु नेहेते, अनिल जंजाळेसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संखेने यात सहभागी झाले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस निरिक्षक डी. के. परदेशी यांनी ताफ्यासह चोख बंदोबस्त ठेवला.