इंधन दरवाढीविरोधात रावेरला सेनेचा रस्ता रोको

0

आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प ; तहसीलदारांना निवेदन

रावेर:- वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हा होरपळत असून केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांमुळे व फसवी कर्जमाफी, सक्तीची वीज बिल वसुली मुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच पेट्रोल-डिझेल गगनाला भिडल्याने हे दर कमी करण्यासाठी रावेरात शिवसेनेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी दुपारी 12 वाजता रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
आंदोलकांनी महागाई वाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारविरोधात फलक झळकावले. पेट्रोल व डिझेलवर राज्य सरकार व केंद्र सरकार मोठा टॅक्स लावत असल्याने इंधनाच्या किंमती आभाळाल भिडल्या असून महागाई कमी करावी, अशी मागणी करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
योगीराज पाटील, अशोक शिंदे, लक्ष्मण मउटे, घनःशाम पाटील, विनायक पाटील, जिजाबराव पाटील, अविनाश पाटील, पिंटू माळी, शे.इमरान शे.अय्युब, मुकेश चौधरी, प्रवीण पंडीत, हर्षल बेलस्कर, अंकुश आनेकर, शेख मेहमूद शेख मेहबूब, निखील महाजन, रुपेश महाजन, शे.सलीम शे.रज्जाक, राहुल कोळी आदींच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन तहसीलदार प्रशासनाला देण्यात आले.