यावल। डॉ. इकबाल हे नुसते कवी नसून ते फार मोठे तत्ववेत्ताही होते. त्यांनी आपल्या कवितांद्वारे भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या कविता या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ. अ. करीम सालार यांनी केले. तालुक्यातील भालोद येथील निदा सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. इकबाल – तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन करीम सालार बोलत होते.
बालवाङमयावर प्रकट केले विचार
या कार्यशाळेचे उद्घाटन असलम खान हाजी शब्बीर खान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एम. रफिक यांनी डॉ. इकबाल आणि भोपाल, फारुक सैय्यद यांनी डॉ. इकबाल यांचे फन व शख्सियत, डॉ. एस.एच. जैदी यांनी डॉ. इकबाल आणि मोमीन, डॉ. अय्याज शाह यांनी डॉ. इकबाल आणि शाहिन परिंदा, डॉ. मुनाफ यांनी डॉ. इकबाल यांचे अलौकिकत्व तसेच आरिफ खान यांनी डॉ. इकबाल आणि बालवाङमय याविषयावर आपले विचार प्रकट केले. यावेेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ. रऊफ, आर.क्यू. शेख, रईस खान, शकिल अहमद, रईस फैजपुरी, सलिम जनाब, आर.एच. शेख, रहिम रजा, जहिर खान आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना वाचनालयाचे अध्यक्ष जाबिर खान यांनी तर सुत्रसंचालन एस.एम. अन्वर यांनी तर इस्माईल खान यांनी आभार मानले.